गोबी मंच्युरीयन (कृती ) – how make gobi manchurian
साहित्य
1) सर्विंग: 3
2) 4 टेबल स्पून मैदा
3) 2 टेबल स्पून मक्याचे पीठ
4) 1 – फ्लावर
5) चवीनुसार मीठ
6) चवीनुसार काळी मिरी
7) तळण्यासाठी तेल
8) 1 टेबल स्पून सोया सॉस
9) चवीनुसार लाल मिरची पावडर
10 ) साॅससाठी : 3 टेबल स्पून – टोमॅटो केचप
11) 2 टेबल स्पून सोया सॉस
12) 1 टेबल स्पून – व्हिनेगर
13) 1 टेबल स्पून हिरवी मिरची साॅस
14) अजिनोमोटो ( ऐच्छिक )
15) 1 – कांदा
16) 1 – सिमला मिरची
17) 4 टेबल स्पून – कांद्याची हिरवी पात
18) चवीनुसार पांढरी मिरी
19) 2 – हिरव्या मिरच्या
20) 1 टेबल स्पून – बारीक चिरलेले आल्ले व लसूण
21) 2 टेबल स्पून – परतण्यासाठी तेल
सूचना
1) साॅस तयार करण्यासाठी : पॅनमध्ये 2 टेबल स्पून तेल टाकून गरम करून घ्यावे, आल्ले व लसूण टाकून परतावे , नंतर हिरवी मिरची व कांदा घालून परतावे. कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात सिमला मिरची घालावी . आता मीठ , मिरी, लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावे .
2) अजिनोमोटो आणि सर्व साॅसेज घालावीत , उच्च आचेवर सातत्याने परतत रहावे.
3) 1 कप पाणी टाकून ते उकळू द्यावे, नंतर मक्याचे पीठ , पाणी घालून अर्धे पातळ करावे आणि साॅसमध्ये टाकावे. मिसळून घ्यावे आणि आंच बंद करावी.
4) मक्याचे पीठ, मैदा, मिरी ,मीठ, अजिनोमोटो व 1 चमचा सोया सॉस घेऊन पातळ बॅटर तयार करावे.
5) बॅटरमध्ये फ्लॉवरची फुले बुडवून ती कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळावीत.
6) मंद आचेवर साॅस गरम करावे, त्यात फ्लाॅवर घालावा आणि छानपैकी हलवत रहावे. फ्लाॅवरवर साॅसचे आवरण पूर्ण बसल्याची खात्री करावी. त्यावर कांद्याची हिरवी पात टाकावी .
गरमागरम खायला द्यावे