7वा वेतन आयोग कासा असणार जाणून घ्या : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी(Big news for government employees), या दिवशी याची होणार घोषणा?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्याबाबतचा (Mehngai Bhatta) निर्णय होणार आहे. केंद्र सरकार लवकरच DAबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
सरकारकडून महागाई भत्ता (Dearness Allowance)याची घोषणा 28 सप्टेंबर अर्थात तिसऱ्या नवरात्री होईल. सप्टेंबरच्या पगारात डीएचे पैसे मिळणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टच्या एरिअसही (DA Arrear) मिळणार आहे.
डीएमध्ये किती वाढ होणार?
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) किती वाढेल यासाठी सरकार AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) इंडेक्सचा डेटा वापरते. AICPI-IW च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनमध्ये निर्देशांक 129.2 वर पोहोचला आहे. निर्देशांकाच्या वाढीमुळे डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होण्याची खात्री आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे.
38 टक्के DA चे पैसे कधी येणार?
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के झाला आहे. वाढलेला महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारात दिला जाईल. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल. अशा स्थितीत जुलै आणि ऑगस्टच्या थकबाकीचाही यात समावेश होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठा पैसा येईल.
हेही वाचा – केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपये मिळणार
किती होणार डीए
DA मध्ये 4 टक्के वाढ झाली तर ती 38 टक्के होईल. सध्या सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. डीए 38 टक्के असल्याने पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. 4 टक्के DA सह किमान आणि कमाल मूळ वेतन किती वाढेल ते पाहूया?
कमाल मूळ पगाराचे कॅलकुलेशन
1. कर्मचार्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये
2. नवीन महागाई भत्ता (38%) 21,622 रुपये/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) 19,346 रुपये/महिना
4.किती महागाई भत्त्यात वाढ 21,622-19,346 = 2260 रुपये/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12= 27,120 रुपये
किमान मूळ पगाराचे कॅलकुलेशन
1. कर्मचार्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये
2. नवीन महागाई भत्ता (38 %) 6840 रुपये/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) 6120 रुपये/महिना
4. किती महागाई भत्त्यात वाढ 6840-6120 = 1080 रुपये/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12= 8640 रुपये