Monday, December 23, 2024

कोणताही देव ब्राह्मण नाही (No God is Brahman) , भगवान शंकरही शुद्र; ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांचे विधान

- Advertisement -

कोणताही देव ब्राह्मण नाही (No God is Brahman) , भगवान शंकरही शुद्र; ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांचे विधान

star marathi news
star marathi news

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेचे कारण विद्यार्थी नाहीत तर थेट कुलगुरू आहेत. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान मिळवणाऱ्या प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित (JNU Vice Chancellor Santishree Dhulipudi Pandit) यांच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

कोणताही देव ब्राह्मण नसल्याचे (No God is Brahman) शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृती या ग्रंथावरही हल्लाबोल चढवला.

सोमावारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आयोजित महामानव डॉ. भीमराव आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये Dr B R Ambedkar’s Thoughts on Gender Justice: Decoding the Uniform Civil Code या विषयावर बोलताना कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी मानवशास्त्र आणि वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास हिंदू देव-देवता उच्चवर्णीय नसल्याचे म्हटले. एवढेच नाही तर भगवान शिवशंकरही शुद्र जातीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

मनुस्मृतीमध्ये महिलांनाही शुद्रांचा दर्जा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मनुस्मृतीनुसार सर्व महिला शुद्र आहेत. त्यामुळे कोणतीच महिला मी ब्राह्मण आहे किंवा इतर वर्णाची आहे असे म्हणू शकत नाही. महिलांना त्यांची जात वडिलांकडून किंवा पतीकडून मिळते. हे प्रतिगामीपणाचे लक्षण आहे, असे शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी म्हटले.

हेही वाचा- 7वा वेतन आयोग कासा असणार जाणून घ्या : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी(Big news for government employees), या दिवशी याची होणार घोषणा?

मानवशास्त्र आणि वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या देवांची उत्पत्ती पाहिल्यास ते उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण नसल्याचे दिसते. भगवान शिवशंकरही अनुसूचित जाती किंवा जमातीचे असावेत. कारण ते स्मशानभूमीमध्ये सापांसोबत बसतात. ते कपडेही खुप कमी घालतात. ब्राह्मण स्मशानामध्ये असे बसू शकतील असे मला वाटत नाही, असेही शांतीश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, मानव वंशशास्त्रीयदृष्ट्या माता लक्ष्मी, शक्ती एवढेच नाही तर भगवान जगन्नाथही उच्चवर्णीय नाहीत. भगवान जगन्नाथ हे आदिवासी आहेत. देवही विविधवर्णीय असल्याने आपण आपल्यात भेदभाव का करतो? एकमेकांशी अमानवीय का वागतो? असा सवालही शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी उपस्थित केला. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे आपल्याला अवलोकन करावे लागेल, कारण आधुनिक हिंदुस्थानमध्ये त्यांच्याएवढे महान विचार असणारा नेता नव्हता, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी हिंदू धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, तसेच असेल तर आपण टिकेला का घाबरतो, असेही त्या म्हणाल्या.

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles