Monday, December 23, 2024

ह्या वर्षीचा दसरा दिवाळी पावसात भिजत साजरी करावी लागणार- Big Alert High Rain

- Advertisement -

ह्या वर्षीचा दसरा दिवाळी पावसात भिजत साजरी करावी लागणार- Big Alert High Rain

सद्यःस्थितीत पडणारा पाऊस हा आणखी चार महिने कोसळणार असून सप्टेंबर अखेर पाऊस आणखी वाढण्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. महापूरांचा धोका कायम असून चार महिने मान्सून पुढे सरकला असल्याचा प्राथमिक परंतू अतिशय धक्कादायक निष्कर्ष त्यांनी काढला आहे. माहितीनुसार, ४ ऑक्टोबर नंतर निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती प्रक्रीया वाढीस लागेल आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल (Big Alert High Rain), अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
साधारणतः मान्सून १ जूनला सुरू होतो आणि तो ३० सप्टेंबरला संपतो.मात्र यावेळी जवळपास चार महिने मान्सून पुढे सरकला आहे. आगामी दसरा-दिवाळीचे सण मुसळधार पावसातच साजरे करावे लागतील, तसेच जानेवारी अखेरपर्यंत पाऊस बरसेल आणि फेब्रुवारीत देखील पाऊस दिसू शकेल, असा अंदाज जोहरे यांनी व्यक्त केला आहे.

हे हि वाचा – गंभीर – दुःखदायक आणि चिंताजनक… शिरोळ तालुक्यात 15 जनावरांना लम्पी चर्मरोगाची (Lumpy Skin Disease)लागण…

ऑक्टोबर मध्येही पावसाचे प्रमाण राहणार आहे. ऑक्टोबरनंतर पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होऊन पावसाळा जानेवारीपर्यंत लांबणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस दिर्घकाळ आव्हाने देत ठाण मांडणार आहे. यंदा तब्बल जुलैत झालेला पाऊस सूर्यावरील चुंबकीय वादळांमुळे झाला. विशेष म्हणजे यावर्षी अद्याप एकही प्रबळ चक्रीवादळ तयार झालेले नाही, ही देखील गंभीर बाब आहे. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नच्या न्यू नॉर्मलला शेतकरी व जनसामान्यांनी येत्या काळात घावरून न जाता

मान्सूनच्या नव्या पॅटर्नला स्वीकारावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत. भरलेल्या धरणांनी पुढच्या वर्षाचा पाणी प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त होत असला तरी तब्बल डिसेंबरपर्यंत पडणारा मोठा पाऊस धरणे आणि बंधान्यांसाठी धोक्याचा इशारा देणारा आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत आताच धरणांचे आणि बंधाऱ्यांच्या पाण्याचे नियोजन करताना त्यांची तपासणी व धरणांचे पाणी कमी करत आकाशातील व कचमेंट एरियातील पाणी सामावण्यासाठी ३० ते ४० टक्के जागा निर्माण करणे गांभीर्याने व तातडीने आवश्यक गरजेचे आहे. यासाठी आतापासूनच शेतीचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन-जागृती करणे गरजेचे असल्याचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles