The tension of persuading family members for love marriage
लव्ह मॅरेजसाठी घरच्यांना मनवण्याचं टेन्शन आता सोडा; फक्त ‘या’ गोष्टी करा आणि होकार मिळालाच समजा
लव्ह मॅरेज हे प्रेम आणि विश्वासाच्या खोल पायावर टिकणारे नाते आहे. अशा स्थितीत अशी अनेक जोडपी आहेत जी जगाच्या सर्व विरोधाला तोंड देत, त्यांना हवा तो जोडीदार निवडतात.
यामध्ये काही जण असे असतात की जे आपल्या आई-वडिलांसमोर नतमस्तक होतात. पण अनेकवेळा जोडीदारापासून विभक्त होऊनही जेव्हा त्याच्याशिवाय मन लागत नाही, तेव्हा तुमचे नाते यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. प्रेमविवाहाला घरचे लोक आधी पाठिंबा देणार नाहीत ही वेगळी गोष्ट, पण जेव्हा तुमचा इरादा पक्का असेल, तेव्हा त्यांनाही वितळावे लागते. तुम्हालाही तुमच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे का?
तर तुमच्या पालकांचे मन वळवण्यासाठी या पद्धतींचा अवश्य अवलंब करा. – तुमच्या घरच्यांसमोर जोडीदाराची केवळ स्तुती करू नका. त्याला एकदा कुटुंबातील सदस्यांना भेटवण्याचा प्रयत्न करा. पण आई-वडिलांसमोर कधीच अचानक जोडीदाराला बोलावू नका.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणत्याही फॅमिली फंक्शनला किंवा गेट-टूगेदरला आमंत्रित करू शकता.
नाशिककर सावधान! दोन महिन्यात स्वाईन फ्लूचे 79 रुग्ण, ‘ही’ लक्षणे आढळल्यास वेळीच तपासणी करा!
जर तुमचे कोणावर प्रेम असेल आणि तुम्हाला लग्न करायचे असेल तर त्याच्याबद्दल घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चांगल्या सवयी पालकांना सांगू शकता.
तसेच तुम्ही वेळोवेळी त्याची प्रशंसा करू शकता. यामुळे तुमच्या पालकांसमोर तुमच्या जोडीदाराची चांगली प्रतिमा तयार होईल. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही प्रेमविवाह करण्याविषयी बोलता तेव्हा तुमचे पालक सहमत होऊ शकतात. – प्रत्येक घरात सुख-दु:ख येत राहतात.
तुम्ही योग्य वेळेची वाट पहा. घाईमुळे काम बिघडू शकते. जेव्हा घरात सर्वजण खूप आनंदी असतात, अशा वेळी पालकांना प्रेमविवाह करण्याबद्दल सांगा. जर तुमचे पालक तुमच्या आयुष्यात असलेल्या व्यक्तीला आधीच ओळखत असतील तर ते खूप सोपे होईल.
पालकांना योग्य वेळी हे सांगितल्यास लग्नासाठी सहमत होऊ शकतात. – तुमच्या कुटुंबात असा एखादा सदस्य असेल जो तुमच्या खूप जवळचा असेल. त्याला तुमच्या जोडीदाराविषयी सांगा. तुमच्या आई-वडिलांचे मन वळवण्यात ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते.
तुमची साथ देऊन आई वडिलांसमोर बोलणारं कोणी असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो.
तुमच्या घरात लव्ह मॅरेजबद्दल बोलण्यापूर्वी तुम्ही प्रेमविवाह केलेल्या मित्राचे किंवा नातेवाईकाचे उदाहरण देऊ शकता. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावर विश्वास बसतो. यासोबतच त्यांचा प्रेमविवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. या व्यतिरिक्त जेव्हाही तुम्ही तुमच्या पालकांना प्रेमविवाहाबद्दल सांगाल तेव्हा त्या वेळी नम्र व्हा आणि त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.