Know today’s horoscope 22-August – 2022: या राशीच्या लोक रातो-रात होतील श्रीमंत, अशी कोणती रास आहे जाणून घ्या, आजचे राशी भविष्य
मेष :
प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यवसायासाठी हालचाली सुरू होतील. घरातील प्रलंबित कामे पूर्णत्वास न्याल. कार्यक्षेत्रात आपण घेत असलेली मेहनत यशाचे मार्ग प्रशस्त करेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आपल्या विरोधकांचा त्रास संभवतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना मैत्रिणीचा सल्ला उपयुक्त ठरेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा.
वृषभ :
आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य सुरू करा. आजचा दिवस मध्यम फलदायी. एखादी जुनी समस्या पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कला, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा मान, सन्मान वाढवणारा दिवस. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला व्यवसायासाठी लाभदायक ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांसाठी पैसे खर्च होतील.
मिथुन :
कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. जुनी कामे मार्गी लागतील. लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक होईल. बुद्धी आणि कौशल्य वापरून हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.
कर्क :
जोडीदाराच्या मतांचा आदर करा. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरी, व्यवसाय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कार्यक्षेत्रासाठी मोलाचा ठरेल. खर्च वाढते राहतील. अनावश्यक खर्चांवर वेळीच नियंत्रण ठेवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. मुलांना विवाहासाठी नवीन स्थळे येण्याचे योग.
सिंह :
दिवस मनासारखा घालवाल. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. व्यवसायासंदर्भातील निर्णय संयमाने घ्यावेत. घाई करू नये. कार्यक्षेत्रातील प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्याचे योग आहेत. व्यापारात चढ-उतार पाहायला मिळेल. कर्जाऊ रक्कम परत घेण्यासाठी प्रयत्न करा. दिवसाच्या उत्तरार्धात प्रवास संभवतात. पालकांचे आशीर्वाद लाभतील. मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
कन्या :
हातातील कामे पूर्ण करा. लोकांकडून बक्षिसी मिळेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण भले आपले काम भले, असे धोरण स्वीकारा. कामावर लक्ष केंद्रीत करून मार्गक्रमण करणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मंदावलेला व्यापार गतिमान होईल. फायदा मिळेल. मालमत्तेवरून मतभेदाचे प्रसंग उद्भवतील.
तुळ :
मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तू सापडेल. पराक्रम आणि धनवृद्धी होण्याचे योग. न्यायालयीन प्रकरणांत सकारात्मक वार्ता मिळतील. कार्यक्षेत्रात अपेक्षित यशाकडे वाटचाल सुरू होईल. स्थावर मालमत्तेतून लाभाचा दिवस. मुलांच्या यशाची वार्ता मन प्रसन्न करेल. नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस. सामाजिक मान, सन्मान वाढीस लागेल.
वृश्चिक :
विद्यार्थ्यांनी आळस झटका. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी मानसिक शांतता प्रदान करणारा दिवस. व्यापार, व्यवसायात लाभाच्या उत्तम संधी मिळण्याचे योग. संधीचे सोने करण्यासाठी अधिक मेहनत, परिश्रम घ्यावे लागतील. माहितीच्या जोरावर समस्येचे निराकरण कराल. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक नजर ठेवा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.
धनु :
जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ. दिवस समाधानाचा जाईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. नवनवीन खर्च उद्भवतील. रागावर नियंत्रण ठेवा. कटू बोलणे टाळा. व्यापारातील लाभ मानसिक शांतता प्रदान करेल. कौटुंबिक पातळीवर मतभेद संभवतात. अनावश्यक व्यवहार लांबणीवर टाका.
मकर :
दिवस धावपळीत जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना नवीन ओळखीतून लाभ मिळतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. मान, सन्मान वाढेल. अनावश्यक व्यवहार लांबणीवर टाकावेत. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नये. व्यापारी वर्गाला उत्साहवर्धक दिवस. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. वडिलांची मदत फायदा मिळवून देईल.
कुंभ :
विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्राधान्य द्या. आनंदी बातमी समजेल. मात्र, खर्चात वाढ होईल. कौटुंबिक कामांसाठी धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रात कौतुक होईल. आपले कार्यकौशल्य सहकाऱ्यांना प्रभावित करेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
मीन :
आजचा दिवस लाभदायक असेल. व्यवसायात जोखीम घेण्याचा परिणाम आज फायदेशीर ठरेल. संयम आणि तुमच्या सौम्य वागण्याने समस्या सुधारू शकतात. बुद्धिमत्तेचा वापर करून, तुम्ही आतापर्यंत हरवलेल्या सर्व गोष्टी मिळवू शकता. जर तुम्ही संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करू शकलात तर ते शुभ होईल आणि तुमचे मन प्रसन्न होईल. ७०% नशिबाची साथ आहे.