Knee pain, joint pain increased during rainy season: पावसाळ्यात गुडघेदुखी, सांधेदुखी वाढली असेल तर ? हे करा उपाय, तुम्ही ठाणठणीत बरे होणार.
आजकाल लोकांमध्ये विशेषत: महिलावर्गात अकाली गुडघेदुखीची समस्या वाढताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार हे त्याचे मुख्य कारण आहे. यामुळे केवळ असह्य वेदनाच होत नाहीत, तर उठणे, बसणे आणि चालणे या सामान्य क्रिया करतानाही खूप त्रास होतो.
एवढ्या कमी वयात महिलांना गुडघेदुखी का उद्भवत आहे आणि यावर कोणते सोपे उपाय करावेत, ते जाणून घेऊया.
-
स्त्रियांचा गुडघा लवकर निकामी
एका संशोधनानुसार, 60 टक्के स्त्रिया हाडांशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त आहेत. उदा. संधिवात. गुडघेदुखीची समस्या असणाऱ्या बहुतेक महिला गृहिणी आहेत. यामागचे कारण म्हणजे त्या आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे योग्य लक्ष देत नाही. स्त्रियांमध्ये गुडघा समस्या लवकर सुरू होण्याचे दुसरे कारण म्हणजे लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, उन्हात जास्त वेळ राहणे, उंच टाचांच्या सॅंडल्स घालणे आणि कुपोषण हे देखील आहे.
-
गुडघा रिप्लेसमेंट सर्जरी उपयुक्त?
बऱ्याच लोकांना असे वाटते की, त्यांना गुडघा प्रत्यरोपण म्हणजेच नी-रिप्लेसमेंट सर्जरी केले की, कोणतीही समस्या होणार नाही. तथापि, तसे होण्याची शक्यता कमी असते. अशा शस्त्रक्रियेनंतरही आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा ही समस्या वाढू शकते.
हेही वाचा – पोरांनी 85 टक्के गुण मिळवले तरीही विध्यार्थीचे नैराश्य ! तिसऱ्या यादीचा कटऑफ वाढला, विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
-
अकाली गुडघे निकामी होण्याची अन्य कारणे
– जास्त व्यायाम
– प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता
– ट्रेडमिल वर चालणे
– पुरेशी झोप न घेणे
-बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे
– चुकीचे खाणे-पिणे
– अनेक तास चुकीच्या पॉश्चरमध्ये बसणे
– कृत्रिम पद्धतीने चालणे
अकाली गुडघेदुखीच्या समस्येवर उपाय
1.प्रथम, शक्य तितक्या शारीरिक हालचाली करा. दररोज किमान 45-50 मिनिटांचा व्यायाम किंवा योगा करा.
2.हिरव्या भाज्या, हंगामी फळे, शेंगदाणे, सोयाबीन, डाळी, नारळपाणी, ऑलिव्ह ऑइल आणि रस इत्यादी निरोगी गोष्टी आहारात घ्या.
3.हे देखील लक्षात घ्या की, आपल्या आहारात प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या अत्यावश्यक घटकांचा समावेश असावा. कारण हाडाच्या बळकटीसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे.
4.जास्त वजनामुळे गुडघे, कंबर इत्यादी सांध्यावर खूप जोर दिला जातो. अशा परिस्थितीत लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
5.धूम्रपान आणि मद्यपान हे हृदय, फुफ्फुस आणि हाडे यांच्यासाठी हानिकारक आहे, म्हणून त्यांच्यापासून दूर राहा.
6.जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नका. ऑफिसमध्येही मधूनमधून 5-6 मिनिटांचा ब्रेक घेत राहा.
7.सांध्यामध्ये तीव्र वेदना झाल्यास एरंडेल तेलाने मालिश करा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल तसेच सूज कमी होईल.
8. महिलांनीही घरकाम, ऑफिस काम यामधून जरा वेळ काढून स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे.