अभिषेक बच्चनचा ऐश्वर्या सोबत डान्स आणि KISS, मुलगी आराध्याने अशी दिली प्रतिक्रिया
बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन बी-टाऊनमध्ये त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहेत. लग्नानंतर ऐश्वर्याचे संपूर्ण लक्ष मुलगी आराध्याचे संगोपन आणि अभिषेकसोबत कौटुंबिक जीवन जगण्यावर आहे.
आता आराध्याही आता बरीच मोठी झाली आहे आणि तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. व्हेकेशन असो की कुठलीही पार्टी, सर्वत्र ऐश्वर्या आपल्या मुलीचा चाहत्यांसमोर आणत असते. आता आराध्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे होता जो खूप वेगाने व्हायरलही झाला होता. सोबत ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या आई बाबांच्या डान्सवर प्रतिक्रिया देताना दिली होती. IIFA चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या मुलीसोबत तिथे आले होते. अभिषेक बच्चनने स्टेजवर दमदार परफॉर्मन्स दिला. परफॉर्मन्सच्या दरम्यान अभिषेक ऐश्वर्याकडे आला आणिऐश्वर्या प्रेक्षकांमध्ये बसून अभिषेकसोबत डान्स करत होती. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यादरम्यान
अभिषेकने ऐश्वर्याला फ्लाइंग किसही केले.
हे ही वाचा – सचिन तेंडुलकरची लेक ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते…’In love with the person
अभिषेकच्या या परफॉर्मन्सनंतर होस्ट मनीष पॉलने आराध्याला तिच्या वडिलांनी केलेल्या डान्सबद्दल प्रश्न विचारला. यावर आराध्याने माईक पकडला आणि इंग्रजीत म्हणाली, “खूप, खूप छान.” तेव्हा आराध्याचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.