धक्कादायक! प्रेमसंबंध (love affair) ठेवण्यासाठी घराशेजारी राहणाऱ्या महिलेचा तगादा; तरुणाने संपवलं जीवन
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, तीस वर्षाच्या तरुणांने गळाफास घेऊन आत्महत्या (Youth suicide) केली आहे.
घराशेजारी राहणारी महिला प्रेम संबंध ठेवून लग्न करण्यास दबाव आणत असल्याने, या विवाहित तरुणाने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. गणेश सुभाष मुसळे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गणेश याच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मुसळे हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडी शरनापुर येथे टायर पंक्चर दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान दोन तीन दिवसांपूर्वीच गणेश आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्या मूळगावी लोहगावला आला होता. शुक्रवारी रात्री आईवडील झोपी गेल्यावर उशीरा घरातील एका खोलीत गणेश याने गळफास घेऊन जीवन संपवलं. दरम्यान मध्यरात्री आईला जाग आली असता मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
पोलिसांची घटनास्थळी धाव…
गणेशच्या आत्महत्येची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत गणेश यास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रूग्णालयाच्या अहवालावरून बिडकीन पोलीस ठाण्यात सुरवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गणेशच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर 306 प्रमाणे आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा – आशिया कपमधील पराभव लागला जिव्हारी (Defeated in the Asia Cup), स्टार खेळाडूनं तडाकफडकी घेतला संन्यास
शेजारच्या महिलेच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या….
गणेशाच्या पत्नीने बिडकीन पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गणेश मूसळे यास त्यांच्या शेजारी रहाणारी महिला तिच्यासोबत प्रेम संबंध (love affair) ठेवून लग्न कर व स्वतःच्या पत्नीस सोडून दे अशा प्रकारचा वारंवार समक्ष व फोनवर तगादा लावून मारण्याच्या धमक्या देत असे. शेजारच्या महिलेच्या नेहमीच्या धमकीला आणि माणसिक त्रासाल कंटाळूनच गणेश याने आत्महत्या केली असल्याचं तिच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शेजारच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.