Monday, December 23, 2024

Ice Cream Girl died : आईस्क्रिमचा हट्ट बेतला जीवावर, चार वर्षाच्या मुलीचा शॉक लागल्याने मृत्यू

- Advertisement -

Ice Cream Girl died : आईस्क्रिमचा हट्ट बेतला जीवावर, चार वर्षाच्या मुलीचा शॉक लागल्याने मृत्यू

Star marathi news
Star marathi news

नाशिक, 3 सप्टेंबर : आईवडील आपल्या मुलांचे शक्य ते सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका चार वर्षाच्या मुलीने आपल्या पालकांना आईस्क्रिमचा हट्ट केला होता.

मात्र, यावेळी एक दुर्दैवी घटना घडली. मेडिकल स्टोअरमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Ice Cream Girl died) . ग्रीष्मा विकास कुलकर्णी, असे या मुलीचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना – याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे राहतात. त्यांचा नाशिकमध्ये खासगी व्यवसाय आहे. गुरुवारी 1 ऑगस्टला ते घरी आले आणि त्यांनी कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाची आरती केली.

यानंतर ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. ती ऐकत नसल्याने तिला तिचे वडील जवळच असलेल्या एका मेडिकलमध्ये घेऊन गेले. या मेडिकलमध्ये आईस्क्रीमचे मोठे फ्रीज होते. आईस्क्रीम मिळाल्यावर ग्रीष्माला आनंदी होती.

यावेळी तिने फ्रीजरमधील विविध फ्लेवरचे आईस्क्रीममधून फ्लेवर निवडण्यासाठी फ्रीजमध्ये डोकावण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, फ्रीजची उंची तिच्यापेक्षा जास्त असल्याने आईस्क्रीमसाठी तिने पाय फ्रिजरच्या ब्रॅकेटवर ठेवले. मात्र, फ्रिजरच्या वायरचा ब्रकेटमध्ये उतरलेला विद्युतप्रवाह ग्रीष्माला लागला आणि ती जागेवरच कोसळत बेशुद्ध झाली. यानतंर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

 हे ही वाचा – BREAKING : करमाळ्यात मालगाडीचे इंजिन रूळावरून घसरले, मोठी दुर्घटना टळली -Railway engine derailed in Karmala

 

पालकांची मागणी – आईस्क्रीम फ्रीजर सहसा दुकानाच्या बाहेर ठेवण्यात येतात. त्यांची रात्री सुरक्षा व्हावी, यासाठी त्यांना लोखंडी ब्रॅकेट तयार केले जाते. मात्र, अनेकदा या फ्रिजरच्या खाली असलेल्या फ्रिजर जाळीचा विद्युतप्रवाह ब्रॅकेटमध्ये उतरलेला असतो.

शूज किंवा चप्पल घातलेली असल्यामुळे अनेकदा या विद्युतप्रवाहाचा धोका नसते. मात्र, अनवाणी असेल तर शॉक लागतो. अशावेळी अतिक्रमित जागेत बाहेर ठेवलेले फ्रिजर यांची तपासणी वेळोवेळी होण्याची गरज आहे. तसेच औषधांच्या दुकानाच्या बाहेर अशा फ्रिजरला परवानगी किमान द्यायला नको, अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles