Johnson and Johnson बेबी पावडरचा उत्पादन परवाना कायमस्वरुपी रद्द, FDA ने केली मोठी कारवाई!
Johnson and Johnson Baby Powder : ही पावडर नवजात बालकांच्या त्वचेस हानीकारक असल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे. एफडीएने या कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला.
Johnson and Johnson Baby Powder : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson and Johnson Baby) कंपनीवर अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने (FDA) मोठी कारवाई केली आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा बेबी पावडर (Johnson and Johnson Baby Powder ) तयार करण्याचा उत्पादन परवाना एफडीएने कायमस्वरुपी रद्द केला आहे. राज्यात अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरची व्रिक्री केली जात होती. पण आता कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाचा परवानाच (Manufacturing License) रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसानीची झळ देखील सोसावी लागणार आहे
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादन केलेल्या ‘जॉन्सन जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक आणि पुणे येथील अन्न व औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. ही पावडर नवजात बालकांच्या त्वचेस हानीकारक असल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे. एफडीएने या कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला.
हे हि वाचा – गंभीर – दुःखदायक आणि चिंताजनक… शिरोळ तालुक्यात 15 जनावरांना लम्पी चर्मरोगाची (Lumpy Skin Disease)लागण…
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही आहे. या पावडरच्या वापराने नवजात शिशू आणि लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावडरचे उत्पादन सुरू ठेवणे हे बालकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. ही बाब लक्षात घेता एफडीने कारवाई करत या कंपनीच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडर या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. या कारवाईनंतर मार्केटमध्ये जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचे बेबी पावडर विकले जाणार नाही.