Monday, December 23, 2024

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी For employees working in state government service…

- Advertisement -

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी …

For employees working in state government service…

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता बाबत आत्ताची मोठी बातमी आली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत घरभाडे भत्ता दिला जाणार नाही . याबाबत शासनाकडुन आदेशही जारी करण्यात आलेले आहेत . याबाबत नेमका आदेश काय आहे , कोणत्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद होणार याबाबतची अधिकृत्त वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .

Star Marathi News-For employees working in state government service
Star Marathi News-For employees working in state government service

राज्यातील शासन सेवेत कार्यरत मुख्यालयी राहणे बंधकारक असलेले पद / ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधकारक आहे . किंवा कामाच्या ठिकाणाहुन जवळच्या गावात राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करण्यात येतो . यासाठी कर्मचाऱ्यांकडुन (state government service) मुख्यालयी राहत असल्याबाबतचे पत्र सादर करण्याचे बंधकारक असते .परंतु अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसून घरभाडे भत्ताचा लाभ घेत असल्याची तक्रार आ.प्रशांत बंब यांनी विधीमंडळामध्ये केल्याने ,खुलताबादचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहे . जे कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील , अशा शिक्षकांना माहे सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये , घरभाडे भत्ता लागु करण्यात येणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे .

हे हि वाचा – शेतकऱ्यांनो सावधान… ! या अळीमुळे गमवू शकतो जीव 

मुख्यालयी राहणेबाबत शासन निर्णय काय आहे ?

ग्रामीण भागाचा विकास व्हावा , तसेच गावपातळीवर विकासात्मक कामे लवकर पार पाडावी यासाठी ग्रामीण भागामध्ये , राज्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासन निर्णयानुसार बंधकारक करण्यात आले आहे . यामध्ये तलाठी , ग्रामसेवक , शिक्षक यांना कामाच्या ठिकाण मुख्यालयी राहण्यासाठी राज्य शासनाकडुन घरभाडे भत्ता अदा करण्यात येतो

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles