शेतकऱ्यांनो सावधान… ! या अळीमुळे गमवू शकतो जीव …(Farmers beware…! Lives can be lost due to this worm…)
तरुणीस घोणस अळीचा दंश
अंबकमधील घटना : जिल्ह्यातील अनेक गावांत धुमाकूळ : शेतकऱ्यांत भीती
कडेगाव : अंबक (ता. कडेगाव) येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) या तरुणीच्या पायाला घोणस अळीने दंश केल्याने त्यांना चिंचणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, लोकरी मावा आणि हुमणी अशा संकटातून मार्ग काढत वाटचाल करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस नावाच्या या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे (Farmers beware…! Lives can be lost due to this worm…)
अंबक येथील अश्विनी जगदाळे ही युवती कुटुंबासह शेतात राहण्यास आहे. रविवारी दुपारी ती घराबाहेर वाळत
घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी घराजवळ असलेल्या गवतात घोणस नावाच्या विषारी अळीवर तिचा
हे हि वाचा – पोटावरची चरबी मेणासारखी विरघळेल जर लावाल या सवयी, बेली फॅटला (Belly fat) म्हणाल कायमचे बाय!
पाय पडला. यावेळी अश्विनीच्या तळपायाला अळीने दंश केला. अळीच्या अंगावरील काटे अश्विनी हिच्या तळपायाला टोचले.
त्यानंतर वेदना असह्य झाल्याने तिला चिंचणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर
पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्विनी हिच्या आईने ही आळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यामुळे ती घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले.