- Advertisement -
आशिया कपमधील पराभव लागला जिव्हारी (Defeated in the Asia Cup), स्टार खेळाडूनं तडाकफडकी घेतला संन्यास
आशिया कप स्पर्धा सध्या UAE मध्ये सुरू आहे. या आशिय कप दरम्यान अनेक क्रिकेटपटून दुखापत किंवा आजारपणामुळे आशिया कपमधून बाहेर पडत आहेत. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
आशिया कपमध्ये टीमचा झालेला पराभव जिव्हारी लागला (Defeated in the Asia Cup). त्यामुळे स्टार खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानं खळबळ उडाली. टीमलाही मोठा धक्का बसला आहे.
बांगलादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहमानने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
बांगलादेश टीममधील मिडल ऑर्डरची जान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुशफिकुर रहीमने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर संन्यास घेण्याबाबत घोषणा केली. त्याने ट्विट केले की, ‘कसोटी आणि वन डेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.
हे ही वाचा-एकनाथ शिंदेंच्या पुढच्या प्लॅनिंगला दे धक्का; उद्धव ठाकरे करणार ‘कमबॅक’ Udhav thakare comeback?
जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी फ्रान्चायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दोन फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे.” क्रिकेटर मुशफिकुर वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं त्याने सांगितलं. त्याने बांगलादेशकडून 102 टी-20 सामने खेळले आहेत. आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात बांग्लादेश टीमला वाईट पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेकडूनही टीमचा पराभव झाला.
- Advertisement -