BREAKING NEWS: करमाळ्यात मालगाडीचे इंजिन रूळावरून घसरले, मोठी दुर्घटना टळली- Railway engine derailed in Karmala
करमाळा, 04 सप्टेंबर : सोलापूर (solapur) जिल्ह्यात रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. करमाळा मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर मालगाडी घसरली आहे (Railway engine derailed in Karmala). मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर केम हद्दीत लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले (Cargo train engine derails in Karmala) आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोलापूरकडून पुणेच्या दिशेने ही मालगाडी जात होती.
करमाळ्याजवळ पोहोचली असता अचानक मालगाडीच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. लुप लाईनवर हा प्रकार घडला. त्यामुळे मालगाडीचे दोन्ही इंजिन हे रुळावरून खाली घसरले. इंजिन रुळावरून घसरल्यानंतर मोठा आवाज झाला.
हे ही वाचा – SBI Saving Account : स्टेट बँकेत उघडा मुलांचे बचत खाते! जाणून घ्या, फायदे आणि खाते उघडण्याची प्रोसेस
इंजिनला लागून असलेले तीन डब्बेही रुळावरून खाली घसरले. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट सुरक्षित आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मालगाडी मार्गावरून येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. घसरलेले मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सुरू आहे.