लॉजमध्ये तरुणीसोबत (Crime-Young lady at the lodge) पहा काय घडलं? पाहून थक्क व्हाल.
सांगली कोल्हापूर रोडवरील एका लॉजमध्ये अस्मिता पाटील या तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी संशयित म्हणून एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. हे दोघेही मित्र असून रात्रीच या लॉजमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी सकाळी अस्मिताचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला विचारणा केली असता अस्मिताने आत्महत्या केल्याचे (Crime-Young lady at the lodge ) त्यांनी सांगितले. त्यावेळी मी स्वच्छतागृहात गेलो होतो असेही सांगितले. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचे दिसत असले तरी खुनाच्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.
हे ही वाचा – इचलकरंजी – कापड महागणार
दरम्यान, मृत तरुणी आणि तरुण दोघेही सांगलीतील रहिवाशी आहेत. अनेक दिवसापासून त्यांच्यात मैत्री होती असे पोलिसांनी सांगितले. अस्मिताच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख पुढील तपास करीत आहेत.