महाराष्ट्र : खुशखबर, राज्य सरकारने कर्मचाऱ्यासाठी , घेतला हा मोठा निर्णय (Good news, state government has taken decision for the employee)
good-news
बाप्पाच्या आगमानाला काही दिवस बाकी आहे. त्याआधी राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. गणपती आगमानाआधीच त्यांच्या खिशात पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यांना बाप्पा पावलाय.
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर (Good news, state government has taken decision for the employee) दिल्याने आनंदाचे वातावरण आहे. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणार आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणार आहे. शासनाने यासंदर्भात काल परिपत्रक काढले आहे.
हे ही वाचा – 5G’ सेवा या दिवशी सुरू होणार…5G services will start
दरम्यान, त्याआधी 16 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांने वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, नवीन डीए ऑगस्टमध्येच लागू होईल. CMO च्या निवेदनानुसार, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.