इचलकरंजी ब्रेकिंग न्युज ; गणेश मंडळांना घरबसल्या परवानगी मिळेल त्यासाठी मोबाईलवर क्यूआर कोड (QR Code on mobile for permission to Ganesh mandals Ichalkarnji)
इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलिसांनी गणेश मंडळांना चांगलीच सुविधा निर्माण केली आहे गणेश मंडळांना परवानगीसाठी मोबाईलवर क्यूआर कोड टाकल्यानंतर गणेश मंडळाचा फॉर्म ऑनलाईन भरता येणार आहे त्यामुळे गणेश मंडळांना सोयीस्कर पडले आहे मंडळांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर 29 व 30 तारखेला पोलीस ठाण्यामध्ये येऊन परवानगी घेऊन जायचे आहे त्यामुळे मंडळांना कुठेही जाण्याची गरज नाही डिजिटल क्रांती सध्या पाहायला मिळत आहे या ऑनलाइन परवानगी मिळाल्यामुळे गणेश मंडळांना सोयीस्कर बनले
इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सार्वजनिक गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते याच अनुषंगाने शहरातील शिवाजीनगर गावभाग शहापूर शहर वाहतूक पोलिसांनी एक चांगलीच सुविधा निर्माण केली आहे मोबाईलवर क्यूआर कोड द्वारे आपला सार्वजनिक गणपती मंडळांचा फॉर्म भरता येणार आहे याची नोंद थेट पोलीस स्टेशनमध्ये होत आहे त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना कुठेही परवानगीसाठी जाण्याची गरज बनली नाही या डिजिटल क्रांतीमुळे सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाला आहे पोलिसांच्या या डिजिटल क्यू आर कोड मुळे मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे
हे ही वाचा – इचलकरंजी – सार्वजनिक कुंड भरल्यानंतर, नदीमध्ये विसर्जन करता येणार आहे निर्णय जाहीर
चारी पोलीस स्टेशन अंतर्गत क्यूआर कोड जारी केले आहेत हे क्यूआर कोड केल्यानंतर मोबाईल (QR Code on mobile for permission to Ganesh mandals Ichalkarnji) मध्ये सार्वजनिक गणपती मंडळाचा फॉर्म कसा भरायचा याचाही नमुना दिला आहे यामध्ये डॉल्बी परवाना सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक परवाना मंडळाचे सदस्य किती असे बऱ्याचश्या फॉर्ममध्ये भरण्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्यामुळे मंडळांना चांगलीच सोय उपलब्ध झाली आहे या डिजिटल क्रांतीमुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहे मंडळांनी लवकरात लवकर या डिजिटल द्वारे आपल्या मंडळाची नोंदणी करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे सर्व सार्वजनिक मंडळांना 29 30 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये येऊन परवानगी घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.