- Advertisement -
हातकणंगले,अंबप गावामधील तरुणाचा अमानुष खून (Brutal murder of man in Ambap village) करून , मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट केला…पहा सविस्तर माहिती
हातकणंगले जवळील अंबप या ठिकाणी शेतात २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा खून (Brutal murder of man in Ambap village) करून मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीला आला. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हे ही वाचा – हातकणंगले : तारदाळ मधील तरुणाचा अपघाताती मृत्यू ( Accident-Tardal ) पहा सविस्तर माहिती…
खून झालेल्या तरुणाची गुरुवार दुपारपर्यंत ओळख पटलेली नव्हती. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अंबप तालुका हातकणंगले येथील शिवकांत पाटील यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या पाटामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
- Advertisement -