Monday, December 23, 2024

हातकणंगले : तारदाळ मधील तरुणाचा अपघाताती मृत्यू ( Accident-Tardal ) पहा सविस्तर माहिती…

- Advertisement -

हातकणंगले : तारदाळ मधील तरुणाचा (Accident-Tardal) अपघातानंतर मृत्यू पहा सविस्तर माहिती…

 

तारदाळ : कामावरून घरी परतत असताना मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात मनोहर आनंदा चौगुले (वय ४३, रा. तारदाळ) हा तरुण जखमी झाला होता. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडला होता. जखमी झालेल्या मनोहर याच्यावर इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी (दि.२४) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पार्वती औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत मनोहर रात्रपाळीत काम करीत होता. मंगळवारी आळते येथे देव दर्शनासाठी जायचे असून तयार रहा, असे त्याने पत्नीला फोनवरुन सांगितले. त्यानंतर तो कामावरून बाहेर पडला. सायंकाळी 7 वाजता संगमनगर रोड मार्गे जगदाळे मळा येथील ओढ्याजवळ मोटरसायकलवरून आला.

हे ही वाचा – फडणवीस शिंदेंचं विशेष कोल्हापूर वर लक्ष  कोल्हापू जिल्ह्याला लॉटरी? १२ आमदारांच्या यादीत फक्त ३ नावे चर्चेत जाणून घ्या अधिक माहिती.

यावेळी समोरुन येणाऱ्या सायकलवरील लहान मुलास चुकवण्याच्या प्रयत्नात त्याची मोटरसायकल घसरली. आणि तो रस्त्यावर जोरदारपणे आपटला (Accident-Tardal). त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles