Monday, December 23, 2024

Accidental death of brother : भावाचा अपघाती मृत्यू तर बहीनीने भावाच्या निधनाच्या धक्याने सोडले प्राण

- Advertisement -

Accidental death of brother : भावाचा अपघाती मृत्यू तर बहीनीने भावाच्या निधनाच्या धक्याने सोडले प्राण

Star marathi news
Star marathi news

शहरातील तरुनाचा नागपुरवरुन येतांना मंगळवारी(ता. २३) ला वर्धा-नागपुर रोडवर रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. तर भावाच्या निधनाचे वृत्त कळताच धक्याने आजारी असलेल्या बहीनीने बुधवारी (ता. २४) ला प्राण सोडल्याने शहरात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. A+ A- सविस्तर वृत असे की

शहरातील बड्डी मजीद परिसरात राहणारा इकबाल किफायद शेख (वय ३५ वर्षे) हा नागपूर येथील विदर्भ टाईल्स येथे मार्केटिंग मॅनेजर पदावर मागील काही वर्षांपासून काम करीत होता. मंगळवारी (ता. २३) ला नेहमीप्रमाणे नागपुरवरुन आपल्या पल्सर गाडी क्रमांक एमएच ४९ एसडी २४७६ ने सिंदी रेल्वे येथे रात्री ७ वाजता दरम्यान परत येत होता.

धवलपेठ पुला अगोदर अज्ञात वाहनाने इक्बालच्या गाडीला जबरधडक दिल्याने डोक्याला मार लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला.

हि बातमी शहरात येवुन धडकताच सर्वत्र शोककळा पसरली. मात्र भावाच्या अशा आकस्मिक अकाली मृत्यूने (Accidental death of brother) आजारी बहीनीला चांगलाच धक्का बसला आणि लागलीच आज बुधवारी (ता. २४)ला बहीन परविन किफायद शेख (वय ४० वर्षे) हिने घरीच प्राण सोडला हे वृत शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेख परिवारात दोन भावंडे, एक बहीन आणि एक म्हातारी आई असा परिवार होता.

 

हेही वाचा – पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं (Half the dream of becoming a policeman); धावता धावता तिने घेतला जगाचा निरोप

एकाचवेळी घरातील कर्त्या मुलाचे असे अपघाती निधन होने आणि याचे दुःख न झेपल्याने बहीनीचे पण लगेच निधन होणे या घटनेने समाजमन सुन्न झाले असुन सर्वाना चटका लावुन गेले आहे 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles