HDFC Bank: सरकारी कर्मचाऱ्यांना बंद करावे लागणार अकाऊंट? जाणून घ्या नेमकं कारण…
खाजगी क्षेत्रातील HDFC बँक तिच्या सेवेमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, पंजाब सरकारच्या जलसंपदा विभागाने कर्मचाऱ्यांना HDFC मध्ये खाते उघडण्यास नकार दिला आहे. इतकेच नाही तर ज्यांचे आधीच HDFC मध्ये खाते आहे त्यांना ते बंद करण्यास सांगितले आहे.
प्रत्यक्षात काही खाण कंत्राटदारांमुळे शासनाच्या जलसंपदा विभागाला कर्मचाऱ्यांना हे आदेश द्यावे लागले आहेत. त्याला बँकह मी देण्यात आली होती. हा आदेश 22 ऑगस्ट 2022 रोजी राज्यस रकारी कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. हे आदेश देतानाप्र धान सचिव म्हणाले की, काही कार्यकारी अभियंता आणि जिल्हाख निकर्म अधिकाऱ्यांना एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा – या’ SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत
प्रधान सचिवांनी जाहिर केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, HDFC बँकेने काही खाण कंत्राटदारांना बँक हमी दिली होती. या कंत्राटदारांनी राज्य सरकारला देयके देण्यात हलगर्जीपणा केला आहे. खात्याशी संबंधित अधिकारी बँक गॅरंटी एनकॅश करण्यासाठी आले असता, बँकेने कारण नसताना तसे करण्यास नकार दिला. या आधारे आता HDFC बँकेत खाते ठेवणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.