६ सेकंदाची मस्ती अन् ६ महिने तुरूंगवास! सामन्यादरम्यान अश्लील कृत्य करणं जोडप्याला पडलं महागात (Indecent acts cost the couple dearly); ६ सेकंदाची मस्ती अन् ६ महिने तुरूंगवास
प्रेम आंधळे असते प्रेमात व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो असे नेहमी बोलले जाते. सध्या याचाच एक प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. बेसबॉलचा सामना (Baseball Match) पाहण्यासाठी आलेले जोडपे (Couple) दिवसाढवळ्या स्टेडियमवर अश्लील चाळे करत होते (Indecent acts cost the couple dearly) , ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित जोडप्यावर कारवाई केली आहे. आता या जोडप्याला ६ सेकंदाच्या व्हायरल व्हिडीओसाठी (Viral Video) ६ महिन्यांचा तुरूंगवास (Jail) होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पुण्यात केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू (A young man died after being stuck in a machine), एकुलता एक कमावता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दरम्यान, ऑकलंडमधील रिंग सेंट्रल कोलिझियम स्टेडियमवर ऑकलंड ॲथलेटिक्स आणि सीटल मरिन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी एका जोडप्यानेही हजेरी लावली होती, त्यांनी स्टेडियम निम्मे रिकामे पाहून संधीचा फायदा घेतला. शेवटच्या सीटवर बसून या जोडप्याने अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. या जोडप्याच्या अश्लील कृत्याचा ६ सेकंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांना मिळाली माहिती
यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबद्दल TMZ ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ऑकलंड पोलिसांना याबाबत काहीही माहिती नव्हती. सामना संपल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, जर हे जोडपे दोषी आढळले, ज्याची दाट शक्यता देखील आहे. असे झाल्यास ६ महिने तुरूंगवास किंवा ८०,००० रूपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. या सामन्यात ॲथलेटिक्सने मरीन्सचा ५-३ ने पराभव केला.