Monday, December 23, 2024

ब्रह्मोस मिसफायर प्रकरणी (Brahmos misfire case) मोठी कारवाई; हवाई दलाचे तीन अधिकारी बडतर्फ

- Advertisement -

ब्रह्मोस मिसफायर प्रकरणी (Brahmos misfire case) मोठी कारवाई; हवाई दलाचे तीन अधिकारी बडतर्फ

या वर्षी मार्च महिन्यात हिंदुस्थानचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र काही चुकीमुळे पाकिस्तानात पडले होते. त्यावर मोठा वादही झाला होता. आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. या प्रकरणी कारवाई करत हिंदुस्थानने हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

हिंदुस्थानचे हत्यारविरहीत सुपरसोनिक क्षेपणास्त्र लाहोरपासून 275 किलोमीटरवर पाकिस्तानच्या क्षेत्रात पडले होते. त्यामुळे एका कोल्ड स्टोरजेचे नुकसान झाले होते. या घटनेत जिवीतहानी झाली नव्हती. या घटनेबाबत हिंदुस्थानने खेद व्यक्त करत चौकशी करण्याचे जाहीर केले होते.

वाईस एअर मार्शल आर. के. सिन्हा यांनी या प्रकरणाचा तपास करत एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले होते. त्या तपासाच्या आधारावर हवाई दलाच्या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे (Brahmos misfire case). भविष्यात अशा निष्काळजीपणाच्या घटना घडू नये, यासाठी ही कठोर करावाई करण्यात आली आहे.

हेही वाचा  – केला कहर, याला काय म्हणावं! पोलीस असल्याचं सांगत चक्क रेल्वे स्टेशनबाहेरचा फूटपाथ विकला 

अनवधानाने झालेली ही घटना असून त्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खेद व्यक्त केला होता. हे प्रकरण हिंदुस्थानने गांभीर्याने घेतले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणाच्या तपासात एकापेक्षा जास्त अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता तीन अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles