केला कहर, याला काय म्हणावं! पोलीस असल्याचं सांगत चक्क रेल्वे स्टेशनबाहेरचा फूटपाथ विकला (The footpath outside the railway station was sold)
पैसा कमवण्यासाठी लोकं कोणत्या मार्गाने भ्रष्टाचार करतील याचा काही नेम नाही. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तोतया पोलिसाने चक्क रेल्वे स्टेशनबाहेरचा फूटपाथ भाडेतत्वावर विकला (footpath outside the railway station was sold).
रात्री या फूटपाथवर झोपलेल्यांकडून तो दर महिन्याला पैसे वसूल करत होता.
हरिद्वारमध्ये रहाणारा भूपेंद्र नावाचा हा व्यक्ती स्वत:ला पोलीस असल्याचं सांगायचा. निराधार लोकांकडून फुटपाथवर झोपण्याच्या बदल्यात तो या लोकाकंडून दर महिना दोन हजार रुपये वसूल करत होता. पैसे न दिल्यास तो लोकांना शिवीगाळ करुन हाकलून देत असे.
मुरली मनोहर नावाच्या एका सफाई कामगाराने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर भूपेंद्रविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली. आरोपी भूपेंद्र याने मुरली मनोहर या चहा विक्रेत्याकडूनही अशाच प्रकारे 14 हजार रुपये वसूल केले होते. पैसे न दिल्यास खोट्या प्रकरणात अडवण्याची धमकीही दिली होती
हेही वाचा – मक्याच्या शेतात जबरदस्तीने ओढून नेत सामूहिक बलात्कार, पुणे जिल्ह्यातील संतापजनक घटना
जेव्हा पोलिसात हे प्रकरण गेलं, तेव्हा भूपेंद्र नावाचा कोणताही पोलीस नसल्याचं समोर आलं. त्यामुळे मुरली मनोहरने थेट कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भूपेंद्रला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.