Monday, December 23, 2024

पुण्यात केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू (A young man died after being stuck in a machine), एकुलता एक कमावता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर

- Advertisement -

पुण्यात केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू (A young man died after being stuck in a machine), एकुलता एक कमावता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुण्यात केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू, एकुलता एक कमावता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर
  • पुण्यातील एका खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरूण कामगाराचा मृत्यू झाला. स्वस्तिक दयाराम शेलार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याचे वय 25 इतके होते. खेड तालुक्यातील कनेरसर येथे असलेल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (SEZ) असलेल्या अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण घटना – कंपनीत काम करीत असताना मशीनमध्ये हात जाऊन या तरुमाचा मृत्यू झाला (A young man died after being stuck in a machine),

असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांनी आरोप केला आहे.

तसेच मृत तरुणाचा मोठा भाऊ प्रतीक दयाराम शेलार यांनी खेड पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. यानंतर कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत स्वस्तिक याची घरची परिस्थिती बिकट आहे. तो घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता.

त्याचा मोठा भाऊ हा शिक्षित आहे. मात्र, बेरोजगार आहे. तर त्याचे वडील हे अंध आहेत. तसेच त्याची आई मोलमजुरी करून घराला हातभर लावत आहे.

या दुर्घटनेमुळे स्वस्तिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक दयाराम शेलार याचा छोटा भाऊ स्वस्तिक दयाराम शेलार हा सायगाव या ठिकाणी राहत होता. तसेच मागील सहा महिन्यापासून खेड तालुक्यातील कनेरसर येथील अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी करत होता. 22 ऑगस्टच्या रात्री तो कामावर गेला असता कंपनीत ही घटना घडली.

हेही वाचा – प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या अडचणीमध्ये वाढ , लखनौ कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट, नेमकं कारण काय? जाणून घ्या.

दरम्यान, या घटनेची माहिती त्याच कंपनीत कामाला असलेल्या त्याचा आत्ये भाऊ योगेश यांनी दिली. हा चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेला तेव्हा त्यावेळी कंपनीचे कोणते कर्मचारी-अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हते. पोलिसांनी यावेळी स्वस्तिक दयाराम शेलार याचा कंपनीत अपघात झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर कंपनीने हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा मुळे चालू मशीनमध्ये अडकून स्वस्तिकचा मृत्यू झाला, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याप्रकरणी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles