Sapna Choudhary Arrest warrant : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या अडचणीमध्ये वाढ , लखनौ कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट, नेमकं कारण काय? जाणून घ्या.
सपना चौधरी व्यतिरिक्त एफआयआरमध्ये कार्यक्रम आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांचीही नावं आहेत. 13 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृती उपवन याठिकाणी दुपारी 3 ते 10 या वेळेत नृत्याचा कार्यक्रम होणार होता.
प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीविरोधात (Sapna Chaudhary) लखनौ इथल्या न्यायालयाने (Lucknow court) अटक वॉरंट (arrest warrant) जारी केलं आहे. एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या तिकिटाचे पैसे घेऊन त्याठिकाणी हजर न राहिल्याने सपनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी पुढील सुनावणीची तारीख 30 सप्टेंबर निश्चित केली आहे. याच न्यायालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये सपनाविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर ती न्यायालयात हजर राहिली होती आणि तिला जामीनसुद्धा मिळाला होता. सपनाला सोमवारी कोर्टात हजर राहायचं होतं. पण ती गैरहजर राहिली आणि तिच्या वकिलानेही कोणत्याही प्रकारची सूट मागितली नाही. त्यामुळे न्यायालयाने सपनाविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.
या संदर्भात उपनिरीक्षक फिरोज खान यांनी 14 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौमधील आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. सपना चौधरी व्यतिरिक्त एफआयआरमध्ये कार्यक्रम आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांचीही नावं आहेत. 13 ऑक्टोबर 2018 रोजी स्मृती उपवन याठिकाणी दुपारी 3 ते 10 या वेळेत नृत्याचा कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमाची तिकिटं 300 रुपये दराने ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली गेली होती. ऐनवेळी सपना चौधरी कार्यक्रमाला न आल्याने आणि त्यांचे पैसेही परत न दिल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी गोंधळ घातला होता.
हेही वाचा – भाऊ श्रेयाला विमान प्रवासात भेटली खास व्यक्ती; नाव ऐकून वाटेल अभिमान
सपनावर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सपना चौधरीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासभंगाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला होता. एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.