Shreya Bugade : भाऊ श्रेयाला विमान प्रवासात भेटली खास व्यक्ती; नाव ऐकून वाटेल अभिमान
झी मराठीवरील सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. कार्यक्रमात सगळेच विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. नुकताच अभिनेत्री श्रेया बुगडे आणि भाऊ कदमनं कार्यक्रमानिमित्त विमान प्रवास केला.
कलाकारांना कामानिमित्त विमान प्रवास हा करावाचं लागतो. कलाकारांना दररोज नव नवीन लोक भेटतात. अनेक फॅन्स भेटत असतात. पण भाऊ आणि श्रेयाला मात्र विमानात फारचं खास व्यक्ती भेटली.
जिला पाहून दोघांना तिच्याबरोबर फोटो काढायचा मोह आवरला नाही. श्रेयानं तर त्या व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीलाही टॅग केला. कोण आहे ही खास व्यक्ती जाणून घ्या. श्रेया आणि भाऊनं नुकताच विमान प्रवास केला.
या प्रवासात त्यांना लेडी पायलटबरोबर मोठ्या उत्साहात फोटो काढला. आता तुम्ही म्हणाल असे अनेक पायलट दररोज विमान चालवतात. पण भाऊ आणि श्रेयाला भेटलेली लेडी पायलट ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी आहे. अलका कुबलची यांची थोरली मुलगी ईशानी ही लेडी पायलट आहे हे सर्वांनाच माहिती आहे.
हिच ईशानी भाऊ आणि श्रेयाला विमानात भेटताच दोघेही भलतेच खुश झाले. दोघांना ईशानीबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. दोघांनी लेडी पायलट ईशानीबरोबर सेल्फी काढला.
हेही वाचा – पोरांनी 85 टक्के गुण मिळवले तरीही विध्यार्थीचे नैराश्य ! तिसऱ्या यादीचा कटऑफ वाढला, विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
ईशानीबरोबरचा सेल्फी श्रेयानं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत इशानीचं कौतुकही केलं.
अलका ताईंना देखील श्रेयानं स्टोरी टॅग केली आहे. श्रेयानं म्हटलंय,’अलका ताई पाहिलंत का आमच्या विमानाची पायलट कोण आहे? ईशानी आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे’.