Monday, December 23, 2024

हिरकणीनंतर सोनाली कुलकर्णी साकारणार ( After Hirakni, Sonali will play Tararani) ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणींची भूमिका, चित्रपटातील पहिला लूक आऊट

- Advertisement -

हिरकणीनंतर सोनाली कुलकर्णी साकारणार ( After Hirakni, Sonali will play Tararani) ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणींची भूमिका, चित्रपटातील पहिला लूक आऊट

हिरकणीनंतर सोनाली कुलकर्णी साकारणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणींची भूमिका, चित्रपटातील पहिला लूक आऊट

रंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (After Hirakni, Sonali will play Tararani) या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे.

मुंबई मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा – कोणताही देव ब्राह्मण नाही (No God is Brahman) , भगवान शंकरही शुद्र; ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांचे विधान

मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ”छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ह्या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे.”

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles