Monday, December 23, 2024

Intelligent People Why Unhappy : बुद्धिमान व्यक्ती दुःखी का ? नसेल माहिती तर जाणून घ्या या मगच कारण…

- Advertisement -

Intelligent People Why Unhappy : बुद्धिमान व्यक्ती दुःखी का ? नसेल माहिती तर जाणून घ्या या मगच कारण…

बुद्धिमान व्यक्ती बरेचवेळा असमाधानी व दुःखी (Why Intelligent People Are Mostly Unhappy) असतात. बुद्धिमान नसणं व अतिबुद्धिमान असणं या दोन्ही गोष्टी माणसाला दुःखी करू शकतात.

Intelligent People Why Unhappy
Intelligent People Why Unhappy

या संदर्भात अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वेनं म्हटलंय, “मला माहीत आहे, बुद्धिमान व्यक्तींमध्ये आनंद ही दुर्मिळ गोष्ट असते.” बऱ्याच अंशी हे खरं आहे. आपल्या समाजात प्रत्येकावर सतत चांगलं करण्याचा दबाव असतो. चांगली गाडी, चांगलं घर, चांगली नोकरी असं उत्तमोत्तम साध्य करण्यासाठी सतत स्पर्धा केली जाते. बुद्धिमान व्यक्तींवर तर हा दबाव जास्त असतो.

मात्र सगळं साध्य करूनही अशा व्यक्ती समाधानी व आनंदी दिसत नाहीत. त्यामागे काय कारणं असू शकतील, हे जाणून घेऊ.

1. हे लोक अतिविचार करतात बुद्धिमान व्यक्तींना परिस्थितीचं आकलन लवकर आणि व्यवस्थित होतं.

ते खूप विचार करतात. अनेक घटना किंवा परिस्थितींमध्ये इतर लोकांपेक्षा जास्त विचार करतात. यामुळे त्यांच्या मेंदूत अनेक विचार व चिंता घर करून बसतात. हे त्यांच्या दुःखी असण्याचं एक कारण असू शकतं.

हेही Human Body: मानवी शरीराशी निगडीत ‘या’ आहेत अद्भुत गोष्टी

2. कायम मोठी उद्दिष्टं समोर असतात बुद्धिमान व्यक्ती आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना सतत काहीतरी नवं आणि मोठं साध्य (Big Life Goals) करायचं असतं. आयुष्याबाबत, पैशांबाबत त्यांची मोठी स्वप्नं असतात.

सर्वसाधारण गोष्टींमध्ये ते बोअर होतात. कारण या गोष्टींमध्ये काही नवीन करण्यासारखं नसतं. सतत नावीन्याचा, मोठं काही करण्याचा ध्यास त्यांना गप्प बसू देत नाही व असमाधानी ठेवतो.

3. नेहमी कामाचच बोलायचं असतं बुद्धिमान व्यक्तींना सतत कामाविषयीच (Only Work Talks) बोलायचं असतं.

अशा स्वभावामुळे त्यांचं ऐकून घेणाऱ्या, त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्ती त्यांच्याजवळ अभावानंच दिसतात. बुद्धिमान व्यक्ती स्वतः इतरांचं ऐकून घेतात, समजूनही घेतात. त्यांना उथळ गप्पा आवडत नाहीत. अर्थपूर्ण विश्लेषण व सखोल चर्चा त्यांना आवडतात.

हे सर्वांनाच जमत नाही. त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्ती दिसत नाहीत. यामुळे ते दुःखी होतात.

4. इतरांकडून जास्त अपेक्षा कोणत्याही गोष्टीचा विचार करताना त्यातून किती फायदा होईल, याचा या व्यक्ती अधिक विचार करतात.

त्यांच्या अपेक्षेनुसार फायदा होत नसेल, तर त्यांना वाईट वाटतं. हे एवढ्यावरच थांबत नाही. हे कोणामुळे झालंय, याचाही ते शोध घेतात. अशा व्यक्तीकडून अपेक्षा (More Expectations) पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून ते दुःखी होतात.

हेही वाचा – अदानी ग्रुपचा ‘हा’ खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

5. स्वतःचं क्रूरतेनं परीक्षण करतात बुद्धिमान माणसांना शहाणपण इतकं आवडतं, की इतरांच्या तुलनेत स्वतःचं परीक्षण करतानाही ते अत्यंत कठोर (Harsh In Self Judging) होतात. स्वतःचा विचार करण्यातही ते खूप वेळ खर्च करतात.

स्वतःबाबत जितका जास्त विचार ते करतात, तितकं जास्त त्यांना वाईट वाटतं. हेच त्यांच्या दुःखाचं एक कारण ठरतं.

6. अशा लोकांना मानसिक आजारांचा सर्वाधिक धोका एका अभ्यासानुसार, बुद्धिमान आणि हुशार व्यक्तींना मानसिक आजार होण्याचा धोका (Prone To Psychological Disorders) जास्त असतो. लोकांची भीती वाटणं, बायपोलर डिसऑर्डर अशा प्रकारचे मानसिक आजार शहाण्या व बुद्धिमान व्यक्तींमध्ये जास्त आढळून आले आहेत

 

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles