In the head while bathing: अंघोळ करताना डोक्यात शिरला मेंदू पोखणारा किडा; मुलाचा रुग्णालयातच 10 दिवसात मृत्यू!
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : नदीवरुन अंघोळ करून परतलेल्या 13 वर्षीय मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. नेमकं काय घडलं, की ज्यामुळे मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला? द मिररने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अमेरिकेतील एका गावातील आहे. येथे 13 वर्षीय मुलगा Elkhorn नदीत अंघोळ करण्यासाठी गेला होता.
अंघोळ करीत असताना एक किडा मुलाच्या नाकावाटे त्याच्या डोक्यात शिरला. यांतर मुलाच्या शरीरात संसर्ग परसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र येथेच उपचारादरम्यान 10 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा – चीनमध्ये खूप लोकांना नवीन ‘लांग्या’ विषाणूची लागण झाली आहे
मुलाचा मृत्यू मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे पसरणाऱ्या एका दुर्मिळ प्रकारच्या संसर्गामुळे झाला आहे. डगलस काऊंटी आरोग्य विभागानुसार, मुलाला प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस नावाचा दुर्मीळ मेंदूचा संसर्ग झाला होता. हा संसर्ग Naegleria Fowleri अमीबामुळे होतो.
हा अमीबा इतको धोकादायक असतो की, मेंदूचे सेल्स खातो. ज्यामुळे व्यक्तीच्या मेंदूत संसर्ग पसरतो. आणि त्याचा मृत्यू होता. Naegleria Fowleri अमीबा इतका लहान असतो की, हा सूक्ष्मदर्शीशिवाय पाहता येऊ शकत नाही. मात्र हा छोटासा जीव व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो.