Monday, December 23, 2024

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर सावध राहा? सरकारचा मोठा इशारा

- Advertisement -

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर सावध राहा? सरकारचा मोठा इशारा

Google Crome -Star marathi news
Google Crome -Star marathi

Google Chrome :

जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउजर्सपैकी एक असलेल्या गुगल क्रोमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कंप्युटर आणि मोबाइल फोनवर याचा जास्त प्रमाणात होतो.

मात्र आता सरकारकडून Google Chrome बाबत एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अर्लट Google Chrome डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी आहे.

इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) युजर्सला त्यांनी डेस्कटॉप ब्राउजर लवकरात लवकर अपडेट करण्याचं सांगितलं आहे. गुगलने क्रोम ब्राउजरमध्ये (Chrome) आलेल्या त्रुटींचा स्वीकार केला होता आणि त्यानुसार नवं अपडेट जारी केलं होतं. हेच पाहता इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने यासंबंधी नोट जारी करत युजर्सला अपडेटची माहिती दिली आहे. CERT-In ने आपल्या नोटमध्ये सांगितलं, की गुगल क्रोमची अतिसंवेदनशीलता सायबर क्रिमिनल्सला आकर्षित करू शकते. हे हॅकर्स दूरवर बसून युजरच्या सिस्टममध्ये धोकादायक कोड एग्जिक्यूट करुन आणि सिक्योरिटी मोडण्याचं काम करतात. तसंच हे हॅकर्स युजर वापरत असलेलं सध्याचं सॉफ्टवेयरदेखील करप्ट करू शकतात.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिलेल्या माहितीनुसार, या धोक्यामागे असे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांचा गुगल क्रोमवर वापर केला जातो. सेफ ब्राउजिंग, रीडर्स मोड, वेब सर्च, थंबनेल टॅब स्ट्रिप, स्क्रिन कॅप्चर, पेमेंट्स, एक्स्टेन्शन्स, स्क्रोल इत्यादी प्लॅटफॉर्म्स आणि फीचर्सचा वापर Google Chrome च्या सुरक्षिततेला धोका वाढवतो.

  • असे सुरक्षित रहा

    यासाठी वापरकर्त्यांनी त्यांचे Google Chrome अॅप तात्काळ नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुगल क्रोमचे जुने डेस्कटॉप व्हर्जन वापरत असाल, तर तुम्ही हे पॅचेस त्वरित लागू करावेत. CERT-In ने यापूर्वी Apple iOS, iPadOS आणि macOS मध्ये आढळलेल्या बग्सबाबत चेतावणी दिली होती.

याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. या उपकरणांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे, रिमोट हल्लेखोरांना लक्ष्यित पीडिताद्वारे उघडण्यासाठी खास तयार केलेल्या फाइल्स मिळू शकतात. वापरकर्त्यांना ही उपकरणे तात्काळ अपडेट करण्यास सांगण्यात आले.

  • कसं कराल अपडेट?

    – सर्वात आधी Chrome ब्राउजर ओपन करा.

– त्यानंतर Help ऑप्शनवर क्लिक करा.

– आता About Google Chrome चा पर्याय दिसेल.

– त्यावर क्लिक करुन क्रोम ब्राउजर अपडेट होण्यास सुरुवात होईल.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles