Monday, December 23, 2024

Who were you : कोण होतास तू काय झालास तू…मराठी सिनेसृष्टीतील या अभिनेत्याला ओळखलंत का?

- Advertisement -

Who were you : कोण होतास तू काय झालास तू…मराठी सिनेसृष्टीतील या अभिनेत्याला ओळखलंत का?

Star marathi news
Star marathi news

मुंबई: टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. पण चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी ते कसे दिसायचे याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते.

अनेक कलाकारांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो (Who were you) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याला ओळखणंही कठिण, असल्याचं अनेकांनी म्हटलं.

सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू असतात , असाच एक नवा ट्रेंड सेलिब्रिटीही फॉलो करताना दिसत आहेत. यात आपला जुना फोटो आणि सध्याचा फोटो शेअर करायचा असतो. म्हणजेच गेल्या काही वर्षात आपण किती बदललो , हे दाखवण्यासाठी हा ट्रेंड सुरू आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता रोहन गुजर यानंही हा ट्रेंड फॉलो करत चाहत्यांसोबत त्याचा जुना फोटो शेअर केलाय. कोण होतास तू काय झालास तू…अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्यात.

रोहनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो काही टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण त्याला खरी ओळख ही ‘होणार सून मी या घरची ’ या मालिकेमुळं मिळाली. त्यानं ही मालिका मी अडीच वर्ष केली. मनोज कोल्हटकर, आशा शेलार आणि तेजश्री प्रधान असं आम्हा चौघांचं नातं चांगलं जुळून आलं होतं.

पण ती मालिका संपल्यावर, चित्रपट, मालिका, नाटकात त्याला तशाच भूमिका येऊ लागल्या होत्या. भावांच्या जवळपास वीस ते पंचवीस भूमिकांना त्यानं नकार दिला. एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर एक डान्स शोही केला होता.

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles