Fraud from dating app in Pune :पुण्यात डेटिंग अॅपवरुन फसवणूक, तरुणीसोबत 50 वर्षाच्या व्यक्तीने ठेवले मनाविरुद्ध शारिरिक संबंध
पुणे, 20 ऑगस्ट : सोशल मीडियाच्या या जगात आभासी प्रतिमा निर्माण करुन प्रेमाचे आश्वासन देऊन अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार याआधी समोर आहे. आता पुण्यात एका राष्ट्रीय महिला खेळाडूची डेटिंग अॅपवर फसवणूक झाली आहे.
तसेच तिच्याशी खोटे बोलून तिच्या मनाविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – पुण्यातील राष्ट्रीय महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर डेटिंग ॲपच्या माध्यमातून हा प्रकार घडला. याबाबत पीडित तरुणीने सांगितले की, तिची अशीच एका डेटिंग ॲपवरून फसवणूक झाली आहे.
तिने सांगितलंय की, ती एक राष्ट्रीय खेळाडू आहे. तसेच स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करत आहे. तिने तिच्या मोबाईलमध्ये डेटिंग अप टिंडर डाऊनलोड केले होते. यानंतर आपल्या स्वतःच्या प्रोफाईलशी एक प्रोफाइल मॅच होत आहे म्हणून तिने एक रिक्वेस्ट स्विकारली.
हेही वाचा – Buy 5G Smartphone : स्मार्टफोन्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार? सरकारच्या ‘या’ निर्णयाचा होणार परिणाम
त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. एकमेकांना नंबर दिले गेले. इतकेच नव्हे तर भेटीगाठी होऊ लागल्या.
यानंतर पुढे या पीडित तरुणीला संबंधित व्यक्तीने वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याशी मुंबई आणि अन्य ठिकाणी तिच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. आरोपीने अनेकदा तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, जेव्हा या पीडित तरुणीला समजले की, आपण ज्या व्यक्तीला डेट करत आहोत तो 50 वर्षांचा पुरुष आहे. तसेच त्याचे लग्न झाले असून त्याला 2 मुले आहेत.
त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे, असे तिच्या लक्षात आले. यानंतर पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तिला न्याय मिळावा, अशी मागणी तिने केली आहे. हेही मुलीसाठी वाद, दोस्तीत कुस्ती, मित्राच्या वडिलांचा भर दिवसा खून, बारामतीत घडलेल्या हत्येचं गूढ अखेर उकललंदरम्यान, पुणे शहरात वर्षभरात डेटिंगवरून फसवणूक झाल्याचे 130 गुन्हे सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहे. तर सोशल मीडियावरून फसवणुकीचे गुन्हे देखील मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. यात मॅट्रीमोनीचे 69 गुन्हे, गिफ्ट कॉलचे 93 गुन्हे, इरीटेटिंग कॉलचे 391 गुन्हे दाखल आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावरील विविध ॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.