Gautam Adani : गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक कंपनी, ७०१७ कोटींना खरेदी करण्याची घोषणा
देशातील आणखी एक कंपनी अदानी समूहाच्या (Adani Group) ताफ्यात सामील झाली गेली आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरने (Adani Power) कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या डीबी पॉवर लिमिटेड (DB Power) खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
यासह, अदानी पॉवरने राज्यातील औष्णिक ऊर्जा क्षेत्रात आपला व्यवसाय वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात ६०० मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्लांटचे दोन युनिट डीबी पॉवरकडे आहेत. हे थर्मल पॉवर प्लांटचे युनिट देखील चालवते. डिलिजेंट पॉवर (Diligent Power – DPPL) ही DB पॉवरची होल्डिंग कंपनी आहे.
हेही वाचा – Girl injured in attack : हातकणंगले येथे भटक्या कूत्र्याच्या हल्यात बालिका जखमी
अदानी पॉवरच्या या अधिग्रहणासाठी सामंजस्य कराराचा प्रारंभिक कालावधी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत असेल. मात्र परस्पर सामंजस्याने त्यात आणखी वाढ करता येईल. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये याचा खुलासा केला आहे. कंपनीने ९२३.५ मेगावॅट क्षमतेसाठी दीर्घकालीन आणि मध्यम-मुदतीचा वीज खरेदी करार केला आहे. तसेच कोल इंडिया लिमिटेडसोबत इंधन पुरवठ्यासाठी करार झाला आहे आणि कंपनीदेखील नफ्यात आहे, असं अदानी पॉवरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
- किती आहे अधिग्रहणाची किंमत?
अदानी पॉवरकडे डीपीपीएलनं एकूण जारी केलेले, सबस्क्राईब्ड आणि पेड अप इक्विटी शेअर भांडवलं आणि प्राधान्य शेअर भांडवालाचा १०० टक्के हिस्सा असेल. त्याच वेळी, डीपीपीएलकडे व्यवहाराच्या शेवटच्या तारखेला डीबी पॉवरचा १०० टक्के हिस्सा असेल. हे अधिग्रहण ७,०१७ कोटी रुपयांच्या अंडरटेकिंग व्हॅल्यूचे असेल. डीबी पॉवर ऑक्टोबर २००६ पासून छत्तीसगडमधील थर्मल पॉवर जनरेटिंग स्टेशन्सची स्थापना, संचालन आणि देखभालीच्या व्यवसायात आहे.
- अदानी पॉवरच्या शेअरची झेप
दरम्यान, आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये वाढ झाली. अदानी (Gautam Adani) पॉवरचा शेअर २.८८ टक्क्यांनी वाढून ४१०.९० रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यातील आकडेवारी पाहिली तर अदानी पॉवरचे शेअर्स ३५ टक्क्यांनी वधारले आहेत. यासह कंपनीचे मार्केट कॅप १.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत अदानी पॉवरने आता सरकारी कंपनी एनटीपीसी (NTPC MCap) ला मागे टाकले आहे.
अदानी पॉवरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने मल्टीबॅगर रिटर्न्स (Multibagger Return) दिले आहेत. गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या शेअरने सुमारे २४० टक्क्यांनी झेप घेतली आहे