A fall in the price of Cement : सिमेंटच्या किंमतीत घट
दरवर्षी साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सिमेंटच्या किमती कमी होत असतात. यावर्षीही ऑगस्ट महिन्यामध्ये सिमेंटच्या किमती कमी झाल्या असल्याचे दिसून येते.
उत्तर आणि मध्य भारतामध्ये सिमेंटच्या किमतीत मासिक पातळीवर दोन ते तीन टक्क्याची घट झाली आहे. मात्र पश्चिम आणि पूर्व भारतामध्ये सिमेंटच्या किमती बऱ्याच प्रमाणात स्थिर झाल्या असल्याचे त्या संदर्भात संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. दक्षिण भारतात मात्र या कालावधीत सिमेंटच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत
हेही वाचा – साने व चांदीच्या दरात मोठी घट
सध्या अखिल भारतीय पातळीवर सिमेंटच्या 50 किलोच्या एका बॅगेला 384 रुपये लागतात. एकीकडे मागणी कमी झाल्यामुळे सिमेंटच्या किमती कमी होत असतानाच सिमेंटसाठीचा कच्चा माल मात्र महाग आहे. कंपन्या दरवाढ करू शकत नाहीत. त्यामुळे या तिमाहित कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा संपल्यानंतर सिमेंटची मागणी वाढू लागेल. अशा परिस्थितीमध्ये सिमेंट कंपन्या पावसाळ्यानंतर सिमेंटच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सिमेंटच्या किमती कमी होऊन कंपन्यांचा नफा कमी होणार असल्यास तरी गेल्या एक महिन्यामध्ये सिमेंट कंपन्यांच्या शेअरच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कारण आगामी काळामध्ये भारतातील बांधकाम उद्योग वेगाने वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. दरम्यानच्या काळामध्ये देशातील घरांच्या किमतीमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. आगामी काळातही कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतर घरांच्या दरात त्या प्रमाणात वाढ होत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर बऱ्याच बॅंकांनी घरासाठीच्या कर्जावरील व्याज दरात वाढ केली असती तरी एकूणच मागणी वाढणार असल्यामुळे बांधकाम उद्योग वाढू शकतो असे समजले जाते