- Advertisement -
- Gold-Silver Rates: साने व चांदीच्या दरात मोठी घट
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या इतिवृत्तामध्ये आगामी काळात महागाई रोखण्यासाठी आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर चलनाच्या तुलनेत डॉलर बळकट होत आहे.
त्याचबरोबर सोने आणि चांदीच्या दरामध्ये घट होत आहे.
जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट झाली त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या घरात घट झाली. गेल्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या दारात ( Gold-Silver Rates ) बरीच घट झाली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 389 रुपयांनी कमी होऊन 51,995 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
हेही वाचा -महागाई रोखण्यासाठी RBI आणखी व्याजदर वाढवणार?
तयार चांदीचा दर 1,607 रुपयांनी कमी होऊन 56,287 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,753 डॉलर व चांदीचा दर 19.23 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
- Advertisement -