In the joy of having a daughter : इतनी खुशी! मुलगी झाल्याच्या आनंदात 1 लाख पाणीपुरी फुकट वाटली
एखादा आनंदाचा क्षण गोड पदार्थ अथवा मिठाई वाटून साजरा केला जातो. मात्र, कोणी पाणीपुरी(panipuri) वाटून आनंदाचा क्षण साजरा केलाय असं सांगितल्यास आश्चर्य वाटेल.
मात्र, एका भाजप कार्यकर्त्याने मुलगी झाल्याचा आनंद पाणीपुरी वाटून साजरा केला आहे. मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्याने तब्बल एक लाख पाणीपुरीचे मोफत वाटप केले आहे. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा आहे.
या सेलिब्रेशनची चर्चा राज्यासह संपूर्ण देशात होत आहे. अंचल गुप्ता असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या. भोपाळमध्ये राहाणारे अंचल गुप्ता हे भाजप कार्यकर्ते असून त्यांचे मुखर्जी नगरात स्वत:चे गुप्ता चाट भंडार नावाचे दुकान आहे.
अंचल कुमार यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अंचल यांनी मुलीचे नाव अनोखी असे ठेवले. अनोखीच्या जन्माचा क्षण अंचल यांनी अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले होतो. यासाठी त्यांनी तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला. गुप्ता यांनी मुलीच्या वाढदिवसानिमीत्ताने एका बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतच गुप्ता यांनी पाणीपुरीचा एक स्टॉल लावला होता. या स्टॉलवर गुप्ता यांनी स्वत: लोकांना प्रेमाने पाणी पुरी खायला दिली. लोकांनी मोफत पाणीपुरी खाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार; भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा
रामेश्वर शर्मा नावाच्या एका व्यक्तीने अंचल यांच्या या अनोख्या पाणीपुरी सेलिब्रेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान महिला सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहेत. त्यांचा ही मोहिम यशस्वी करण्यात अंचल गुप्तासारख्या वडिलांचा अनोखा सहभाग निश्चितच आदर्श ठरवणार असा असल्याचे कॅप्शन रामेश्वर यांनी या व्हिडिओला दिले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच अनोखीला वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी आनंदी, सुखी रहा असं म्हणत चौहान यांनी अनोखीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.