Mahabharata will happen in politics in KOLHAPUR
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार; भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा
कोल्हापूर – महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी कुटनीतीने खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला.
यामुळे येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार, असा इशारा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी रात्री दहीहंडी कार्यक्रमात बोलताना दिला. तसेच, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्व निवडणुकीत भाजप – शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
हे ही वाचा – पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर
राजकारणात कोणी कायम टिकत नसतो. आमचे सलग पराभव झाले. मोठे नैराश्य आले होते. कुटनीती, कपटनीतीने अभिमन्यूला घेरले तसे मला घेरले. अडीच वर्षे प्रचंड त्रास दिला. प्रशासनावर दबाव आणून आमच्या कारखान्याचे सभासद रद्द केले. शिक्षण संस्था बंद पडण्याचा प्रयत्न केला. राजकारण हे एक चक्र आहे. आज आमचे दिवस आले आहेत. यापुढे वाईट्याचे वाईट होईल, असे खा. महाडिक म्हणाले.(Mahabharata will happen in politics in KOLHAPUR)
चुळबुळ करणाऱ्यांना माझा इशारा आहे. येथून पुढील सर्व निवडणुकीत हिशोब चुकता केला जाईल. प्रत्येक निवडणुकीत आमचे यश असेल, असेही ते म्हणाले. कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली