Another blow to Uddhav Thackeray from Konkan : उद्धव ठाकरेंना कोकणातून आणखी एक धक्का, 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार!
मुंबई, 18 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर (Shivsena) इतिहासातलं सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं.
शिवसेनेकडे सध्या कोकणात 3 आमदार आहेत, यात राजन साळवी (Rajan Salvi), वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा समावेश आहे,
MPSC Exam 2022 : एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर, 340 नव्या जागांवर निघाली भरती
यापैकीच एक आमदार पुढच्या 48 तासांमध्ये शिंदेंकडे असू शकतो. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी विरोध केला आहे, तर आमदार राजन साळवी हे रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल आहेत.
काहीच दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे कोकणात होते, तेव्हा त्यांनीही रिफायनरीबाबत अनुकूल अशीच भूमिका घेतली. प्रकल्पामुळे कोकणात रोजगारनिर्मिती होईल आणि कोकणाचा विकास होईल, असं सामंत म्हणाले होते. सध्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे,
त्यामुळे जवळपास सगळेच आमदार मुंबईमध्ये आहेत. कोकणातल्या शिवसेनेच्या 3 पैकी एका आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान आजच उदय सामंत यांनी घोषणाबाजी करणारे विरोधातले आमदार लवकरच शिंदेंकडे येणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं होतं.