Good news for MPSC Exam 2022 aspirants
एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर, 340 नव्या जागांवर निघाली भरती
MPSC Exam 2022 : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. होय… एमपीएससीने 340 नव्या जागांसाठी भरती काढली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस अपअधीक्षक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि सहायक गट विकास अधिकारी यासह विविध पदांसाठी जागा आहेत.
11 मे 2022 रोजी एमपीएससीकडून 161 संवर्गाच्या भरतीकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्येच 340 नव्या पदांचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण 501 जागांवर भरती होणार आहे.
कोणत्या नव्या जागांवर निघाली भरती? –
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9) सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42
एकूण – 340
या तारखेला होणार परीक्षा
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा (Maharashtra Rajyaseva State Services Exam 2021 Date) 2022 ही 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. या भरती परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती केली जाईल. राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर 21 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे
Car Break Fail use Trick : कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? चागंल्या-चांगल्या लोकांना माहीत नाही याचं उत्तर, असा वाचेल आपला जीव
कोण अर्ज करू शकतो?
19 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. जोपर्यंत शैक्षणिक पात्रतेचा संबंध आहे, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तपशील पाहण्यासाठी या नोटीसच्या लिंकवर क्लिक करा
अर्जाची फी किती?
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी (Good news for MPSC Exam 2022 aspirants) अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 544 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये शुल्क भरावे लागेल.