Health Alert: तुम्ही शौचालयात 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवता! हा आजार होण्याची शक्यता
Health Tips: नैसर्गिक विधीसाठी तुम्हाला पाच मिनिटांपेक्षा जास्त अवधी लागत असेल, तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. तुम्हालाही टॉयलेटमध्ये 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर बातमी नक्की वाचा.
टॉयलेटमध्ये बसून वर्तमानपत्र वाचण्याची किंवा फोन स्क्रोल करण्याची सवय तुम्ही ताबडतोब बदलावी लागेल. कारण या दोन्ही सवयी तुमच्या आरोग्याला हानिकारक आहेत. यामुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. तुमचं पुढचं आयुष्य खूपच वेदनादायक होऊ शकते. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका.
ब्रिटीश वेबसाइट द सनच्या रिपोर्टनुसार, टॉप्स टाईल्सने केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की, तेथील लोक आठवड्यातून सरासरी साडेतीन तास टॉयलेटमध्ये घालवतात. सिंगल सिटिंगबद्दल बोलायचं झालं, तर एका व्यक्तीला सरासरी 5 मिनिटे लागतात. इतकंच नाही तर एक व्यक्ती दिवसातून 4 ते 7 वेळा टॉयलेटला जातात.
Stock Market: सलग पाचव्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ
जास्त वेळ शौचालयात बसणे हे मूळव्याध आजाराचे प्रमुख कारण बनू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका अभ्यासानुसार शौचविधी आटोपण्यासाठी आदर्श वेळ 5 मिनिटे आहे.
स्ट्रेसनोमोरच्या संस्थापक स्टेफनी टेलरच्या मते, जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये बसून वर्तमानपत्र वाचण्याचा किंवा मोबाइलवर स्क्रोल करण्याचा आनंद घेतो तेव्हा ते तुमच्या मलाशयाला इजा पोहोचू शकते. जेव्हा तुम्ही टॉयलेट शीटवर बसता तेव्हा मलाशय एका विशिष्ट स्थितीत येते. यामुळे तुमच्या खालच्या मलाशयातील नसांवर अतिरिक्त दाब पडतो. परिणामी शेवटी मूळव्याध होऊ शकतो. हा आजार अत्यंत वेदनादायक असून मलाशयातून रक्तस्राव होऊ शकतो.
बहुतेक वेळा मूळव्याध असाच बरा होतो. पण मूळव्याधची समस्या गंभीर झाली असेल तर रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील. मूळव्याधची समस्या उद्भवू नये म्हणून, पुरेसे फायबर युक्त अन्न खाणे आवश्यक आहे