Titiksha Tawade New Tv Show : सातव्या मुलीची सातवी मुलगी! अभिनेत्री तितिक्षा तावडेच्या नव्या मालिकेचा पहिला लुक आला समोर
त्या मालिकेनंतर अभिनेत्रीनं बराच काळ टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा एकदा तितिक्षा टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तितिक्षा तावडे मुख्य भूमिकेत असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला असून तितिक्षाची फारच वेगळी भूमिका मालिकेत पाहायला मिळत आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका येत्या 12 सप्टेंबरपासून झी मराठीवर रात्री 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. याचाच अर्थ झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. हेही ती जे बोलते ते होतं.
Stock Market: सलग पाचव्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ
तिच्या काळ्या जिभेमुळे गावात सगळंच वाईट घडलं’, अशा वाक्यानं प्रोमोची सुरुवात होत आहे. ज्यात तितिक्षा तावडे पळताना दिसत असून गावातील लोक तिचा पाठलाग करत आहेत. ‘काळ्या पायाची’, ‘अपशकूनी’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ अशा वाईट शब्दांत तिला लोक हिणवताना दिसत आहेत. ‘मी बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते ती बोलते’, असं वाक्य तितिक्षा म्हणताना दिसतेय.
मालिकेचा संपूर्ण प्रोमो पाहून मालिका रहस्यमय आणि गुढ असल्याचं समोर आलं आहे.
झी मराठीवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेची भर पडली आहे. ‘बस बाई बस’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘तु चाल पुढं’ या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
काहीच दिवसात ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका देखील येऊ घातली आहे. त्यातच आता 12 सप्टेंबरपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी कोरी, नवा विषय असलेली मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर तितिक्षानं सरस्वती या मालिकेनंतर ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत काम केलं.
त्यानंतर ‘एक थ्रीलर नाइट’ आणि ‘जयंती’ या सिनेमामधून तितिक्षा प्रेक्षकांच्या भेटीला आली. तितिक्षा ही अभिनेत्री खुशबू तावडेची बहिण आहे. दोघी बहिणींची कमाल केमिस्ट्रींही सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळते.