Health Tips: कॉम्प्युटरवर काम करताना लक्षात ठेवा या 6 गोष्टी, रहाल निरोगी
Health Tips: आजचे युग हायटेक तंत्रज्ञानाचे (technology) आहे. त्यामुळे सरकारी-खासगी क्षेत्रातील बहुतांश कामे कॉम्प्युटरवर (Computer) होतात. आजच्या काळात मोठ्या संख्येने लोक आपला संपूर्ण दिवस त्यासमोर घालवतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर (Eye care) आणि कमरेच्या हाडांवर जास्त परिणाम होतो. लोक गंभीर आजारांना (disease) बळी पडत आहेत. अनेक सर्वेक्षणांमध्ये ही बाब समोर आली आहे. मात्र, या काळात थोडीशी काळजी घेतली तर समस्या निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत कॉम्प्युटरवर काम करताना कोणती खबरदारी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
1. बसण्याची पोज
आरामदायी पाठीचा आधार असलेली चांगली खुर्ची तुमच्या पाठीवर आणि मणक्यावरील दबाव कमी करेल. तुमच्या कॉम्प्युटर डेस्कची उंची तुमच्या वरच्या बाहूंपासून सुमारे 90° च्या कोनात असावी. त्यामुळे त्यानुसार तुमच्या खुर्चीची उंची अॅडजस्ट करा.
2. मॉनिटर लेव्हल
सर्वात पहिले तुमचे मॉनिटर खुप जास्त जवळ देखील असून नये किंवा डोळ्यांपासून खूप दूरही असू नये. दुसरे म्हणजे, तुमचे मॉनिटर डोळ्यांच्या जवळ ठेवा. तिसरे म्हणजेच मॉनिटर पाहतांना वारंवार वाकू नका. यामुळे तुमच्या पाठीमध्ये समस्या होऊ शकते. याचा तुमच्या मनक्यावर दुष्परिणाम होतो.
3. डोळ्यांची काळजी घ्या
कॉम्प्युटरवर नियमित आणि दीर्घकाळ काम केल्याने तुमच्या डोळ्यांवर जोर पडतो. यामुळे दर 15-20 मिनिटांमध्ये आपले डोळे स्क्रीनपासून दूर ठेवा आणि 10-20 फूट अंतरावरच्या कोणत्याही वस्तूला बघा. या व्यतिरिक्त डोळे कोरडे पडू नये यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
4. डेस्क एरिया
आपला डेस्क नेहमी स्वच्छ ठेवा. अशा प्रकारे तुम्ही अधिक एकाग्र आणि कमी विचलित व्हाल. या व्यतिरिक्त तुमच्या जवळ कामाच्या साहित्यासाठी आवश्यक जागा असायला हवी.
5. छोटे ब्रेक घ्या
दर 30-40 मिनिटांनंतर छोटे-छोटे ब्रेक घ्या. यामुळे तुमचा थकव्यापासून बचाव होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. यासोबतच छोट्या-छोट्या ब्रेकने मनक्याच्या हाडावर वाईट परिणाम होणार नाही. या दरम्यान खुर्चीवरुन उठून थोडे-थोडे चालणे फायदेशीर ठरते.
6. हेल्दी फूड
पण जर तुम्हाला 8-10 तास कॉम्प्युटरसोबत बसावे लागत असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्याकडेही लक्ष द्यावे लागेल. आपल्यासाठी हेल्दी फूड महत्वाचे आहे. याशिवाय दर दोन तासांनी काही ना काही खात राहावे. तुमचे डोळे निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही दर 3-6 महिन्यांनी तुमच्या नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.