Viral Video: सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. या प्लॅटफॉर्मवर रोज एकापेक्षा एक असे सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये वन्य प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक किंग कोब्राला पकडताना एक व्यक्ती दिसत आहे ( A man tries to lift a king कोब्रा ). व्हिडीओतील व्यक्ती सापाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र सापाचा आक्रमक पवित्रा पाहून थरकाप उडेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही जण हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
विडिओ साठी या लिंक ला क्लिक करा
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका व्यक्तीने सापाची शेपट पकडली आहे. तसेच त्याचा गळा पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण किंग कोब्रा त्याच्या हाती येताना दिसत नाही.
या दरम्यान कोब्रा पलटवार करत दंश करण्याचा प्रयत्न करतो. पण थोडक्यासाठी अंदाज चुकतो आणि त्यामुळे प्राण वाचले, असं म्हणायला हरकत नाही