Monday, December 23, 2024

Actor Siddharth Jadhav in hospital : अभिनेता सिद्धार्थ जाधव रुग्णालयात दाखल; ‘या’ आजाराशी देतोय झुंज?

- Advertisement -

भिनेता सिद्धार्थ जाधव रुग्णालयात दाखल; ‘या’ आजाराशी देतोय झुंज?

Sidharth jadhav in hospital
Sidharth jadhav in hospital
मुंबई : आपला सिद्धू म्हणजेच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अभिनेता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेतही असतो. यावेळी मात्र सिद्धू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना धक्का दिलाय.

एक पोस्ट शेअर करत त्याने आपण गेला आठवडाभर रुग्णालयात (Actor Siddharth Jadhav in hospital) दाखल असल्याची माहिती शेअर केलीये. अभिनेत्याची ही पोस्ट पाहताच चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टवर अवघ्या काही वेळातच चाहत्यांनी कमेंट करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

हॉस्पिटलमधून सिद्धार्थने हाताचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, नमस्कार …. गेला आठवडाभर मी hinduja hospital मध्ये admit होतो.. आज घरी आलो… मनापासून आभार hinduja hospital च्या staff चं.. खुप मनापासून काळजी घेतली माझी… अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम… एका phone वर नेहमीच धावून येणारे @ameyakhopkar दादा ….शशांक नागवेकर दादा lv u alwyss.. @rajwadesatish दादा आणि @star_pravah परिवार तुमचा support खूप महत्त्वाचा होता….. आणि माझा मोठा भाऊ Dr.lavesh jadhav जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हावं म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद… आता हळूहळू बरा होतोय… खुप धावपळ असते आपली… पण त्यातही स्वतःच्या health कडे दुर्लक्ष होणार नाही याची pls काळजी घ्या… Lv u all… #आपलासिध्दू

अभिनेत्याची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल होऊ लागलीये. मात्र अभिनेता कोणत्या आजाराशी झुंज देतोय. हे अद्याप समोर आलेलं नाहीये. त्यामुळे तो लवकरात लवकर बरा व्हावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजात दिसून येतो. सिद्धार्थच्या अतरंगी स्टाईलनं त्याला मराठीमधला रणवीर सिंहही म्हटलं जातं. नुकताच सिद्धार्थ जाधवचा ‘दे धक्का 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थनं ‘दे धक्का’ मध्ये साकारलेल्या धनाजीला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘दे धक्का 2’ मधूनही त्याच्या भूमिकेला प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय

- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles