शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 6.45 वाजता त्यांचा निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील ‘वॉरेन बफे’ देखील म्हटलं जातं असे. कारण ज्या शेअरला ते हात लावतील त्यात प्रॉफिट कमावण्याची ताकद त्यांची होती. म्हणून त्यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे.
राकेश झुनझुनवाला यांना बिग बुल का म्हणायचे हे त्यांच्या पोर्टफोलियोवर नजर टाकल्यास कळून येईल. राकेश झुनझुनवाला याची संपत्ती जवळपास 33 हजार कोटींच्या जवळपास आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 37 शेअर्समध्ये सार्वजनिक होल्डिंग आहे. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे त्यांचे प्रसिद्ध स्टॉक्स आहेत. यात त्यांची एकूण संपत्ती 19,695.3 कोटी रुपये आहे. यामध्ये टायटन कंपनी (7,879 कोटी), टाटा मोटर्स (1,474.4 कोटी), क्रिसिल (1,063.2 कोटी) हे त्यांचे सर्वात मोठी गुंतवणूक असलेले स्टॉक आहेत.