Monday, December 23, 2024

Vinayak Mete : विनायक मेटेंची गाडी ज्या ट्रकला धडकली तो कुठे? पोलिसांचा मोठा सवाल

- Advertisement -

शिवसंग्राम संघटनेचे नेते अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पण या अपघातावर पोलिसांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. कारही ट्रकला पाठीमागून धडकली आहे, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते.मुंबईला जात असताना विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. गाडीमध्ये त्यावेळी तीन व्यक्ती होते. जखमी व्यक्तींना तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासातून सर्वबाबी समोर येईल. एक मोठा ट्रक होता, या ट्रकला पाठीमागून कार धडकली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दुधे यांनी दिली.

तसंच, सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात आहे त्यानंतर तपास केला जाणार आहे. तो ट्रक घटनास्थळावरून निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे
- Advertisement -

Related Articles

- Advertisement -

Latest Articles